व्याजांच्या पैशांच्या वादातून एकाला फायटरने मारहाण
A fighter beat up a man over a dispute over interest money जळगाव (6 एप्रिल 2025) : व्याजाच्या पैशांची मागणी करत तिघांनी एकाला शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर अन्य एकाने फायटर मारत दुखापत केली. या घटनेत रिक्षा चालक शेक शाकील शेख गुलाब (43, रा.मास्टर कॉलनी, गणेशपुरी) असे जखमीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जोशी पेठ परिसरात लाकूड वखारीजवळ घडली.
याप्रकरणी तक्रारीनुसार शुक्रवारी गोलू शिंपी, सागर सोनवणे, नितीन बोरसे, मयूर या चौघांवर शनिपेठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार परीश जाधव हे तपास करीत आहेत.


