सारोळा येथे धाडसी घरफोडी : 63 हजारांचा ऐवज लंपास
Daring house burglary in Sarola : Property worth Rs 63 thousand looted मुक्ताईनगर (8 एप्रिल 2025) : बंद असलेल्या घराची कडी उघडत चोरट्यांनी घरातील 63 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना सारोळा येथे 5 ते 6 दरम्यान घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
रामसिंग उत्तम गोपाळ (55, सारोळा) हे शेतकरी असून सारोळा येथे परिवारासह वास्तव्यास आहेत. 5 रोजी रात्री नऊ ते 6 रोजी सकाळी 4.15 दरम्यान चोरट्यांनी जुन्या बंद घराची कडी उघडत आत प्रवेश केला. कपाटातून चोरट्यांनी सात ग्रॅम वजनाचे व 61 हजार 800 रुपये किंमतीची सात ग्रॅम वजनाची पोत व पाच ग्रॅमची अंगठी तसेच एक हजार रुपये किंमतीचे लहान मुलांच्या हातातील कडे लांबवले. चोरीचा प्रकार लक्षात येताच शेतकर्याने पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास नाईक नंदकिशोर धनके करीत आहेत.





