भुसावळातील साईचंद्र नगरात भाजपाच्या माजी पदाधिकार्याकडे चोरी
Theft from former BJP office bearer in Saichandra Nagar, Bhusawal भुसावळ (10 एप्रिल 2025) : शहरातील यावल रोडवरील साईचंद्र नगरातील बंद घराला टार्गेट करीत चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. चोरट्यांनी घरातील कुलूप तोडत प्रवेश करीत 32 इंचचा टीव्ही तसेच देवघरातील पूजेसाठीच्या नव्या कोर्या नोटा तसेच चांदीचे काही दागिने लांबवले. हा प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली.
बंद घराला चोरट्यांकडून टार्गेट
लक्ष्मण कौतीक सोयंके हे परिवारासह साईचंद्र नगरात वास्तव्यास आहे. कामानिमित्त ते बाहेरगावी गेल्याने तीन दिवसांपासून घर बंद होते. चोरट्यांनी संधी साधत दरवाजाचे कुलूप तोडत घरात प्रवेश केला. घरातील 32 इंचचा टीव्ही तसेच देवघरातील चांदीचे दागिणे व पूजेसाठी आणलेल्या कोर्या नोटा मिळून एकूण 30 हजारांचा ऐवज लांबवला. शहर पोलिसांनी पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.





