जळगावात दुचाकी चोरीचे सत्र कायम
जळगावात दुचाकी चोरीचे सत्र कायम
JALGAON Bike theft जळगाव (10 एप्रिल 2025) : घरासमोर पार्किंग केलेली सुमारे तीस हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस ( एमएच 19 डीएल 90589) चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना लक्ष्मीनगर रामेश्वर कॉलनी परिसरात रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
या प्रकरणी विकास दयाराम पवार (25, रा.लक्ष्मीनगर) यांच्या तक्रारीनुसार सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार गणेश शिरसाळे हे तपास करीत आहेत.


