चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी : खरजईत घरफोडी करणार्या गावातीलच अट्टल आरोपींना बेड्या
Performance of Chalisgaon City Police : The burglars in Kharjai turned out to be the village’s hardened criminals चाळीसगाव (11 एप्रिल 2025) : चाळीसगाव तालुक्यातील खरजई येथे नोकरदाराकडे मार्च महिन्यात धाडसी घरफोडी झाली होती. चोरट्यांनी एक लाख 68 हजार रुपये किंमतीचे दागिने लांबवले होते. चाळीसगाव शहर पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करीत खरजई गावातीलच आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत 18 हजार रुपये किंमतीची तीन ग्रॅम वजनाची चैन काढून दिली आहे. अक्षय गुलाब कडवे (21) व यश बापू मुलमुले (19, दोन्ही रा.खरजई) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींविरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे..
मार्च महिन्यातील चोरीची उकल
खरजई गावात अमोल माधवराव म्हसके (38, ह.मु. शिवाजी नगर, खरजी नाका, चाळीसगाव) यांचे घर असून नोकरीनिमित्त ते चाळीसगावात राहतात. घर बंद असल्याची संधी साधत 7 मार्च 2025 त्यांच्या बंद घरातून चोरट्यांनी एक लाख 68 हजार रुपये किंमतीचे दागिने लांबवले होते.
चाळीसगाव शहर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल होता. हवालदार प्रशांत पाटील यांना तपासादरम्यान आरोपींची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयीताना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक राजेशसिंह चंदेल, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रशांत पाटील, अजय पाटील, हरिष पाटील, आशुतोष सोनवणे, कॉन्स्टेबल सभा शेख आदींच्या पथकाने केली.


