निंभोर्यातील तरुणाची गळफास घेत आत्महत्या
Youth in Nimbhor commits suicide by hanging भुसावळ (12 एप्रिल 2025) : भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथील 35 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नाहित शेख शफीत शेख (35, निंभोरा, ता.भुसावळ) असे मृताचे नाव आहे.
निंभोरा गावातील नाहित शेख या तरुणाने गळफास घेतल्यानंतर त्यास बेशुद्धावस्थेत भुसावळातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरमध्ये आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोज देऊलकर करीत आहेत.





