जळगाव जिल्हाधिकार्यांना जीवे मारण्याची धमकी : धमकीच्या ई मेलने खळबळ
जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले धमकीच्या ई मेलला गांभीर्य नाही : दोषीवर लवकरच होणार कारवाई
Death threat to Jalgaon District Collector जळगाव (12 एप्रिल 2025) : जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जीवे ठार मारण्यात येईल, असा धमकीचा संदेश मुख्यमंत्री कार्यालयाला पाप्त झाल्यानंतर खळबळ उडाली शिवाय काही अधिकार्यांना मारण्यात येईल व जळगावात अशांतता पसरवू, असा उल्लेखही या मेलमध्ये करण्यात आला आहे. मार्च महिन्यातील या प्रकारानंतर जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी या धमकीच्या मेलमध्ये गांभीर्य नसल्याची माहिती देत पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती माध्यमांना दिली.
मेल करणार्याचा लवकरच शोध : पोलीस अधीक्षक
जळगव जिल्हाधिकारी यांच्यासह विविध पोलिस अधिकार्यांना जीवे मारण्याबाबत अगोदर ही तीन ते चार वेळेस धमकीचे मेल हे पोलिसांना मिळाले आहेत. या मेलमधील भाषा पाहता अशा ईमेलकडे फारसे गांभीर्याने घ्यावे, असे दिसत नाही मात्र तरीही या सगळ्या घटनेबाबत सायबर सेलच्या माध्यमातून गुन्हा दाखल करत मेल करण्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
मेल पाठवणारा व्यक्ती एकच असल्याचा संशय पोलिसांना मेलमध्ये लिहिलेल्या भाषेवरून आला आहे. शेवटचा मेल 27 मार्च 2025 रोजी आला आहे.
मेल पाठवणार्याची चौकशी : पालकमंत्री
या मेलची संपूर्ण चौकशी जळगाव पोलिसांच्या वतीने सुरू आहे. हा गंभीर प्रकार आहे, निश्चितपणे जळगाव पोलिसांच्या माध्यमातून मेल पाठविणार्याची चौकशी करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील पत्रकारांना दिली आहे.


