रावेर परिसरात वादळी पावसासह गारपीट : वृक्ष उन्मळल्याने महामार्ग ठप्प ; केळीला पुन्हा फटका


Thunderstorm with hailstorm in Raver area  रावेर (12 एप्रिल 2025) : शहरासह परिसर शनिवारी दुपारी अचानक आलेल्या वादळीवार्‍यासह पावसाने झोडपून काढले. काही भागत जोरदार गारपीट झाल्याने नागरीकांची मोठी तारांबळ उडाली आहे. पावसासह गारपीटीचा सर्वाधिक मोठा फटका केळीला बसला आहे. आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

झाड कोसळताच महामार्ग ठप्प
बर्‍हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर झाड पडल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक काही काळ ठप्प झाली. काही वेळेनंतर मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. वादळामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला तर काही ठिकाणी वीज ताराही तुटल्या आहेत.


अचानक आलेल्या पावसामुळे उन्हाच्या तडाख्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वादळी वार्‍यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे

या घटनेबाबत तहसीलदार बंडू कापसे म्हणाले की, वादळ, पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. वादळी हवामानामुळे नागरी जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरु आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !