झाडी गावातून दुचाकी चोरणार्या स्थानिक चोरट्याला अमळनेर पोलिसांकडून अटक
Amalner police arrest local thief who stole two-wheeler from Jhadi village अमळनेर (13 एप्रिल 2025) : अमळनेर पोलिसांनी झाडी गावातील महेंद्र धनसिंग पाटील यांची हिरो कंपनीची फॅशन प्रो चोरणार्या चोरट्याला अटक केली आहे. हिरालाल छोटू पाटील असे अटकेतील संशयीताचे नाव असून तो झाडीतील रहिवासी आहे.
महेंद्र पाटील यांची दुचाकी (एम.एच.19 ईई 7165) ही 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 ते 9.20 दरम्यान पुनम हॉटेल शेजारी पार्क केलेली असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. अमळनेर पोलिसांना चोरट्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.
यांनी आवळलया मुसक्या
पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव व गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, निलेश मोरे, गणेश पाटील, राजेंद्र देशमाने, उज्वल म्हस्के, विनोद संदानशिव,अमोल पाटील, प्रशांत पाटील, जितेंद्र निकुंभे, उदय बोरसे यांच्या पथकानेही आरोपीला टटक केली. तपास हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे व कॉन्स्टेबल भूषण परदेशी करीत आहेत.


