तळोद्यातील तत्वज्ञानी मद्यपी चोरट्याचे पत्र सोशल मिडीयावर तुफान व्हायरल

पोलिसांना सवाल विचारत केले अंतर्मुख : किक बसताच लिहिले भावनिक पत्र


Are the police really honest? Emotional letter from an alcoholic from Talodia goes viral on social media तळोदा (13 एप्रिल 2025) : चोरी करणार्‍या चोरट्यांच्या विविध तर्‍हा अनेक वेळा लक्षात राहून जातात. अशाच पद्धत्तीने तळोद्यातील एका बारमध्ये शिरलेल्या चोरट्याने मनसोक्त मद्याचा स्वाद घेत लिहिलेले व नंतर सोशल मिडीयावर व्हायरल झालेले पत्र चर्चेत आले आहे. पोलिस खरेच इमानदार असतात का? असा सवाल या चोरट्याने उपस्थित केला आहे.

तळोदा शहराजवळच अंकलेश्वर बर्‍हाणपूर राज्य मार्गावरील हॉटेल सोनेरी परमिट रूम अँड बिअर बारमध्ये हा चोरटा बसला होता. इथे बसून त्याने मनसोक्त दारूचा आनंद लूटला. जरा किक बसल्यावर त्याने भावनिक पत्र लिहीत त्याच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.




खरा चोर कोण ?
चोराने पत्रात स्पष्ट केले की, माझी कोणाशी वैयक्तिक दुश्मनी नाही. माझी हालतच बेबस आहे. पोलिस खरेच इमानदार असतात का? खराखुरा चोर कोण? जो चोरतो, की जो चोर बनवतो? असा सवाल उपस्थित करत चोरट्याने पोलिसांना देखील आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे.

पैशांवर माणूस प्रेम करतो, अशी उपरोधक टीकाही या चोराने त्याच्या पत्रात केली आहे.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !