दर्गाहवर नवस फेडण्यासाठी आल्यानंतर किनगावातील कुटुंबावर मधमाशांचा हल्ला :नऊ जखमी


Bees attack Kingaon family after they came to pay their vows at the dargah : Nine injured यावल (14 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील किनगाव गावाकडून डांभूर्णी जाणार्‍या रस्त्यावर पाच पीरबाबा दर्गाहवर रविवारी तडवी कुटुंबीयांकडून नवस फेडण्यासाठी स्वयंपाक केला जात असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला. यात नऊ जण जखमी झाले. जखमींना तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. नऊ जणांपैकी तिघांना मधमाशांनी गंभीर चावा घेतला आहे.

तिघांना मधमाशांचा जबर चावा
किनगाव गावातून डांभूर्णीकडे जाणार्‍या रस्त्यावर पाच पीरबाबा यांची दर्गाह आहे. या दरगाहावर रविवारी किनगाव गावातील तडवी कुटुंब नवस फेडण्यासाठी गोड भाताचा स्वयंपाक करत होते. त्याचवेळी मधमाशांनी या कुटुंबावर हल्ला केला. यामध्ये फरीदा जावेद तडवी, नर्गीस रफीक तडवी, जावेद रशीद तडवी, अर्श जावेद तडवी, हमीदा रफिक तडवी, रफिक मुबारक तडवी, अंजुम रुस्तुम तडवी, जोया रुस्तम तडवी, जिशान रफिक तडवी हे नऊ जण जखमी झाले. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉ.तुषार सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.हर्ष पटेल, नेपाली भोळे, कादर तडवी यांनी उपचार केले. नऊ जणांपैकी तिघांना मधमाशांनी जबर चावा घेतला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !