हळदीत गाणे लावण्याचा वाद : चिंचोलीत वढोदा सरपंचासह भावास जबर मारहाण


Dispute over song in Haldi: Vadodara sarpanch and brother severely beaten in Chincholi यावल (14 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील चिंचोली या गावात हळदीच्या कार्यक्रमात गाणे लावण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून वढोदा सरपंच व त्यांचे भाऊ या दोघांना दोघांनी जबर मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि रोख रक्कमदेखील लांबवली. या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले. दोघांवर जळगावात उपचार सुरू असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चिंचोली गावात हळदीच्या कार्यक्रमात गाणे लावण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून राहुल शरद कोळी व अरुण सुखराम कोळी या दोघांनी वढोदा गावाचे सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे व त्यांचे बंधू डॉ. रविराज प्रभाकर सोनवणे या दोघांना जबर मारहाण केली व संदीप सोनवणे यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन लांबवली व डॉ.रवीराज सोनवणे यांच्या खिशातून दहा हजाराची रोकडदेखील लांबवली. मारहाणीत दोघे सोनवणे बंधू हे गंभीर जखमी झाले. दोघांवर जळगाव शहरात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी यावल पोलिसात कैलास कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंतराव बेलदार करीत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !