थोरगव्हाणला 28 वर्षीय महिलेस दोघांची मारहाण


यावल (14 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील थोरगव्हाण या गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाला. या वादातून एका 28 वर्षीय महिलेला दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली तसेच तिला व तिच्या मुलास जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

थोरगव्हाण गावातील रहिवासी रेश्मा विनोद सपकाळ (28) या विवाहितेला जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवाजी सुकलाल सपकाळे व प्रमिला शिवाजी सपकाळे या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. लाथाबुक्याने मारत तिला व तिच्या मुलास जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसाी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अर्जुन सोनवणे करीत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !