निंभोर्‍यात त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या : पतीला अटक


Wife commits suicide due to distress in Nimbhor: Husband arrested भुसावळ (15 एप्रिल 2025) :भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथे 35 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, 10 एप्रिल रोजी घडली होती. सुरूवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र मुलीचा पतीने पैसे आणण्यासाठी छळ केल्याने मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार मयताच्या वडिलांनी दिल्यानंतर आरोपी पतीविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

छळ असह्य झाल्याने विवाहितेची आत्महत्या
निंभोरा, ता.भुसावळ गावातील विवाहिता नाहिद शेख शफिक (35) या विवाहितेने गुरुवार, 10 एप्रिल रोजी राहत्या घरात आत्महत्या केली होती. याप्रकरणी सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र मृत विवाहितेचे वडिल मोहम्मद सादिक इमदादुलहक (65, रा.बाळापूर, जि.अकोला) यांनी आरोपी पती शेख शफिक शेख अमीर (रा.निंभोरा बु.॥, ता.भुसावळ) हा लग्नानंतर विवाहितेने माहेरून पैसे आणावेत म्हणून मुलीचा छळ करीत तिला भांडण करीत मारहाण करीत होता व त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली, अशी तक्रार भुसावळ पोलिसात दिल्यावरून रविवारी सायंकाळी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !