विठ्ठल दर्शनाला गेला, वैकुंठवासी झाला..!

न्हावीच्या ‘त्या’ युवकावर अंत्यसंस्कार


Went to see Vitthal, became a resident of Vaikuntha..! यावल (15 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील न्हावी येथील दर्पण निलेश कोलते हा 18 वर्षीय तरुण पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या पात्रात बुडाल्याने मरण पावला. दर्पण हा त्याच्या 5 मित्रांसोबत छत्रपती संभाजीनगरहून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेला होता. दुर्दैवी घटनेबद्दलच कळताच न्हावी गावात शोककळा पसरली. शोकाकुल वातावरणात दर्पणवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

दर्पण हा त्याचे मित्र मनोज रघुनाथ कापडे, दिगंबर नीलेश पवार (रा. रावेर, आयटीआय विद्यार्थी) तसेच चाळीसगाव व परडी येथील दोन तरुणांसह संभाजीनगरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकलमध्ये द्वितीय वर्षाला शिकत होते. तीन दिवसांची सुट्टी असल्याने या पाचही मित्रांनी पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेऊन येऊ, असे ठरवले.


पंढरपूर येथे पोहोचल्यावर मनोज कापडे, दिगंबर पवार आणि दर्पण कोलते हे चंद्रभागेच्या पात्रात भक्त पुंडलिकाच्या मंदिराजवळ अंघोळीसाठी उतरले. नदीच्या पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने दर्पणचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. त्याच्यासोबत असलेला मनोजही बुडत होता, मात्र नदीकाठी बसलेल्या दिगंबर पवार याने आरडाओरड केल्याने भाविक जमा झाले आणि त्यांनी तत्काळ मनोजला वाचवले. परंतु दर्पणला वाचवता आले नाही. आठ तासांनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !