यावल तालुक्यात वृद्धेचा मृतदेह आढळला : खुनाचा संशय

अपर पोलीस अधीक्षक, डीवायएसपी घटनास्थळी तातडीने रवाना


Body of an elderly man found in Yaval taluka: Murder suspected यावल (16 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील गाडर्‍या गावाच्या जवळील वनक्षेत्रात एका अनोळखी सुमारे 65 वर्षीय वयोगटातील वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे. यावल पोलिसांना माहिती कळताच पथक त्या ठिकाणी दाखल झाले.

मृताची हत्या झाल्याचा संशय
मृतदेहास पंचनामा करून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मयत महिलेची हत्या झाल्याचा संशय असून तिची ओळख पटलेली नाही. तर मंगळवारी दुपारी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखात,े डीवायएसपी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांचे पथक सातपुड्याच्या दिशेने घटनास्थळी रवाना झाले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


गाड्र्‍या, ता.यावल हे गाव यावल शहरापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या कुशीत आहे. या गावातील वनक्षेत्रात एका अनोळखी सुमारे 65 वर्षीय वयोगटातील महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत लतिराम रमेश बारेला याला दिसून आला. त्याने तातडीने यावल पोलिसांना खबर दिली. घटनास्थळी पोलीस निरिीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, पोलीस नाईक वसीम तडवी हे दाखल झाले.

घटनास्थळाचा पंचनामा करून सदर महिलेचा मृतदेह त्यांनी यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी तातडीने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना घटनास्थळावर जाऊन भेट देण्याचे आदेश दिले. अधिकारी वर्गाचे पथक मंगळवारी दुपारी यावल येथून रवाना झाले. वृद्ध महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !