पिंप्राळा हुडकोत महिलेसह नातेवाईकांना दारूच्या नशेत दोघांकडून मारहाण


Woman and relatives beaten up by two drunk men in Pimprala Hudkot जळगाव (18 एप्रिल 2025) : शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात दारूच्या नशेत येऊन काही कारण नसताना एका महिलेला आणि तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत मारहाण करीत मारून मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवार, 16 एप्रिल रोजी रात्री 12.30 वाजता घडली आहे. या संदर्भात मध्यरात्री एक वाजता दोन जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

संगीता सुरेश सूर्यवंशी (40, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या महिला जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरामध्ये कामानिमित्ताने बुधवार, 16 एप्रिल रोजी नातेवाईकांकडे आल्या होत्या. यावेळी रात्री 12.30 वाजता संशयित आरोपी असलम शेख आणि फातिमा खान (पूर्ण नाव माहित नाही, दोन्ही रा.पिंप्राळा हुडको) या दोघांनी दारुच्या नशेत येऊन संगीता सूर्यवंशी आणि त्यांची नातेवाईकांना मारहाण करून शिविगाळ केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान या संदर्भात संगीता सूर्यवंशी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून आरोपी असलम शेख आणि फातिमा खान या दोघांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड हे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !