साळवा येथे विनापरवानगी शिवरायांचा पुतळा बसविला : अज्ञात व्यक्तींवरोधात गुन्हा
Shivaji statue installed in Salva without permission : Crime against unknown persons धरणगाव (18 एप्रिल 2025) : धरणगाव तालुक्यातील साळवा गावामध्ये विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमानुसार बुधवार, 16 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
सन्मानपूर्वक काढला पुतळा
धरणगाव तालुक्यातील साळवा गावामध्ये विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला. शिवरायांचा पुतळा बसविण्याबाबत पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयात कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. ही घटना बुधवार, 16 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता समोर आली.
यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिवरायांची आरती करत सन्मानपूर्वक पुतळा हा ग्रामपंचायत कार्यालयात ठेवला. ग्रामपंचायत अधिकारी रमेश देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री नऊ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस कॉन्स्टेबल सुधीर चौधरी करीत आहे.


