जळगावात स्पा सेंटरआड वेश्या व्यवसाय : चार महिलांची सुटका ; परप्रांतीय दोघांविरोधात गुन्हा
Prostitution business near spa center in Jalgaon : Four women rescued ; Case registered against two migrants जळगाव (18 एप्रिल 2025) : जळगाव गुन्हे शाखेसह शहर पोलिसांनी स्पा सेंटरआड चालणार्या वेश्या व्यवसायावर धाड टाकत चार महिलांची सुटका केली तर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली.
बनावट ग्राहक पाठवून उधळला डाव
जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ नयनतारा ऑर्किड मॉल येथे दुकान नंबर 408 मध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली व्यवसाय चालत असल्याची माहिती जळगाव गुन्हेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी डमी ग्राहक पाठवून खातरजमा केली. स्पा सेंटरमध्ये संशयीत राजू मधुजी जाट (रा.कलोधिया ता. पिंपरी जि. भीलवाडा,राजस्थान) याने बनावट ग्राहकाला स्पा व मसाज व्यतिरिक्त इतर सेवा देण्यासाठी आमिष दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.
छाप्यामध्ये चार महिलांमार्फत देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे दिसले. मालक संशयित विक्रम राजपाल चंदमारी धानी (20, चत्तरगढ पत्ती, जि.सिरसा, हरियाणा) हा व्यवसायाला प्रोत्साहन देत असल्याने त्याच्यासह मॅनेजर राजू जाटविरोधात गुन्हा दाखल करून जाटला अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल भवारी यांच्या नेतृत्वात एपीआय शीतलकुमार नाईक, एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक महेश घायतळ, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, सुनील पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, योगेश पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली महाजन, हेड कॉन्स्टेबल प्रियंका कोळी, मंगला तायडे, चालक दीपक चौधरी यांच्या पथकाने केली.


