जळगावातील फुले मार्केटमध्ये चोरटे शिरजोर : दोन दुकाने फोडली
Thieves raid Phule Market in Jalgaon : Two shops broken into जळगाव (18 एप्रिल 2025) : शहरातील फुले मार्केटमधील पूजा गारमेंट फोडून रोकडसह सामानांची चोरी झाली तर हेमंत किचन वेअर दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याची प्रकार शुक्रवार, 18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता समोर आला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
जळगाव शहरातील फुले मार्केटमध्ये भरत कमल भैरवानी (39, रा.टी.एम. नगर, जळगाव) यांचे पूजा गाऊन गारमेंट दुकान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील गल्ल्यातून 15 ते 20 हजारांची रोकड आणि काही साहित्य लांबवले. ही घटना शुक्रवार, 18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता समोर आली. याच फुले मार्केटमधील चंद्रेश हेमंत शहा (39, रा.शिवराम नगर) यांचे हेमंत किचन वेअर दुकानाचे दोन कुलूप तोडण्यात आले होते परंतु शटरचे सेंट्रल लॉक असल्याने दुकान फुटू शकले नाही. ही घटना उघडकीला आल्यानंतर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.


