एमआयडीसी पोलिसांची कारवाई : पुण्यासह छत्रपती संभाजीनगरातून महागडी बुलेट लांबवणार्‍या चोरट्याला बेड्या


MIDC police action: Thief who smuggled expensive bullets from Pune and Chhatrapati Sambhajinagar arrested जळगाव (20 एप्रिल 2025) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी पुण्यासह छत्रपती संभाजीनगर हद्दीतून महागडी बुलेट चोरी करणार्‍या भामट्याला जळगावातील अजिंठा चौफुली परिसरात बेड्या ठोकल्या आहेत. साजीद खान शकील खान (छत्रपती संभाजीनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चोरीच्या बुलेटला विक्री करण्यासाठी अजिंठा चौफुली परिसरात संशयीत येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निददृश दिले. संशयीत अजिंठा चौफुलीवर येताच त्यास ताब्यात घेवून कसून चौकशी केल्यानंतर त्याने बुलेट चोरीची असल्याची कबुली देत आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली.

अटकेतील साजीद खान याच्याविरुद्ध चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर व सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजी नगर येथे मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

यांनी आवळल्या मुसक्या
एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, हवालदार गणेश शिरसाळे, कॉन्स्टेबल गणेश ठाकरे, राहुल रगडे, विशाल कोळी, योगेश बारी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार गणेश शिरसाळे करत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !