भुसावळ शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला अटक


Minor girl raped in Bhusawal city : Accused arrested भुसावळ (20 एप्रिल 2025) : शहरातील एका भागातील सहा वर्षीय बालिकेवर अमीन नूर मेाहंमद (40, भुसावळ) याने सार्वजनिक शौचालयात नेत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही संतापजनक घटना शुक्रवारी दुपारी एका वाजता समोर आल्यानंतर नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीतांना पोलिसांनी अटक केली.

आरोपीला पोलिसांकडून अटक
शहरातील एका भागातील सहा वर्षीय पीडीतेला शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अमीन नूर मोहंमद याने सार्वजनिक शौचालयात नेत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरातील लोकांनी हा प्रकार पाहिल्यावर लोकांनी त्यास पकडले. चिमुकली घाबरून आईजवळ पळाली. पीडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे. संशयीताला पोलिसांनी अटक केली आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !