दहिवद शिवारात अपघात : बस दुचाकीला धडकल्याने विवाहिता ठार, पती गंभीर


Accident in Dahiwad Shivara: Married woman killed, husband critical after bus hits bike अमळनेर  (20 एप्रिल 2025) : भरधाव बसने दुचाकीला धडक दिल्याने लता मुरलीधर पाटील या महिलेचा मृत्यू झाला तर त्यांचे पती मुरलीधर पाटील गंभीर जखमी झाले.

मुरलीधर पाटील व पत्नी लता पाटील यांच्यासह दहिवद शिवारातील शेतात जाण्यासाठी मोटरसायकलवरून जात असताना ही घटना घडली. चोपडा येथून अमळनेरकडे येणार्‍या यावल आगाराच्या (एम.एच.20 बी.एल.2656) क्रमांकाच्या एसटी बसने त्यांना समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीसह दोघांनाही बसने जवळपास 50 ते 60 फूट ओढत नेले.

या धडकेत लता पाटील गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती मुरलीधर पाटील हे देखील गंभीर जखमी असून त्यांच्यावर अमळनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !