विवाहितेचा विनयभंग ; भुसावळ तालुक्यातील घटना


Sexual assault of a married woman; Incident in Bhusawal taluka भुसावळ  (20 एप्रिल 2025) : भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणार्‍या एका 30 वर्षीय परप्रांतीय महिलेचा अनधिकृतपणे घरात घुसून तिचा विनयभंग करण्यातआली. ही घटना शुक्रवार, 18 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता घडली आहे. याबाबत सायंकाळी 6 वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळ तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय महिला हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 18 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता घरात कोणीही नसताना संशयित प्रवीण सुभाष सुरवाडे यानेमहिलेच्या घरात घुसून महिलेला मिठीत घेऊन तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. महिलेचा पती घरी आल्यानंतर त्यालदेखील चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.


दरम्यान, ही घटना घडल्यानंतर पीडित महिलेने वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन या संदर्भात तक्रार दिल्यावरून संशयित आरोपी प्रवीण सुरवाडे यांच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली. तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद कंखरे करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !