कर्जापुढे टेकले हात : अहिरवाडी येथे शेतकर्‍याची विहीरीत उडी घेवून आत्महत्या


Faced with debt, farmer commits suicide by jumping into well in Ahirwadi रावेर (20 एप्रिल 2025) : कर्जबाजारीपणामुळे तालुक्यातील अहिरवाडी येथील शेतकर्‍याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .विलास युवराज चौघरी (40) असे मृताचे नाव आहे

अहिरवाडी येथील विलास हे शुक्रवारी शेतात गेले होते मात्र सायंकाळी परत आले नाही म्हणून त्यांचा शोध घेतला असता अहिरवाडी शिवारातील गट नंबर 79 या स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली .


ही घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. सततच्या नापीकीमुळे तसेच त्यांचे नावावर बँकेचे दोन लाख रुपये कर्ज आहे. यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची त्यांच्या नातेवाईकांमध्ये चर्चा होती. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !