भुसावळात नऊ अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई
Action taken against nine unauthorized food vendors in Bhusawal भुसावळ (22 एप्रिल 2025) : भुसावळ रेल्वेच्या वाणिज्य विभागासह रेल्वे सुरक्षा बलाने धडक मोहिम राबवत स्थानकावर नऊ अनधिकृत विक्रेत्यांविरोधात कारवाई केल्याने विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. कोणत्याही वैध परवाना किंवा अधिकृत परवानगीशिवाय अन्न व पेय पदार्थ विकताना नऊ विक्रेत्यांना पकडून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार अन्न सेवा मिळत राहण्यासाठी यानंतरही धडक मोहिम सुरूच राहणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच अन्नपदार्थ खरेदी करावेत आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ रेल्वे अधिकार्यांना किंवा आरपीएफला याबाबत माहिती द्यावी.





