कौटुंबिक वादातून समुपदेशनासाठी आलेल्या दाम्पत्याच्या नातेवाईकांमध्ये जळगाव पोलिस अधीक्षक कार्यालयात तुफान हाणामारी
जळगाव (22 एप्रिल 2025) : कौटुंबिक वादातून समुपदेशनासाठी महिला दक्षता कक्षात आलेल्या पती-पत्नीच्या नातेवाईकांमध्ये जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत महिलांचाही सहभाग होता. यामुळे पोलिस यंत्रणाही गोंधळून गेली.
समझोत्यासाठी आल्यानंतर हाणामारी
दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी जिल्हापेठ पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. जळगावच्या डी मार्ट परिसरातील महिलेचा विवाह चाळीसगाव येथे दोन वर्षांपूर्वी झाला होता. पती-पत्नीमध्ये दोन वर्षांत वाद-विवादच झाले. समझोता घडावा म्हणून सोमवारी पहिल्याच तारखेला दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास दोन्ही कडील मंडळी समोरासमोर आणली गेलेली होती. समोरासमोर येताच हे लोक एकमेकांना शिवीगाळ करू लागले. अचानक हाणामारी सुरू झाली. पोलिसांनी मध्यस्थी करून कसेबसे वातावरण निवळले.