हतनूर येथील अल्पवयीन मुलीस पळवले : दोघांविरोधात गुन्हा
भुसावळ (23 एप्रिल 2025) : भुसावळ तालुक्यातील हतनुर गावातील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हतनूर येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला शनिवारी रात्री नऊ वाजता संशयित आरोपी ललित भगवान मोरे व विनोद गुलाब पवार (दोघे हतनूर) यांनी त्यांच्या दुचाकीवरून पळवून नेले.
पीडीतेच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिल्यावरून आरोपींविरोधात वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलीस जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहे.





