भुसावळात जुन्या वादातून विवाहितेला मारहाण
Married woman beaten up over old dispute in Bhusawal भुसावळ (23 एप्रिल 2025) : शहरातील 24 वर्षीय विवाहितेला जुन्या वादातून फायटरने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चौघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेहजादी जायद अली (24, मुस्लीम कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ, भुसावळ) या विवाहितेच्या तक्रारीनुसार, सोमवार, 21 रोजी सकाळी नऊ वाजता संशयीत कानिझा हुजूर अली, सुकैना जावेद अली, हसनैन जाफर अली व जावेद शफी अली (सर्व रा.बीसीएन, रजा टॉवर, भुसावळ) या संशयीतांनी जुन्या वादातून मारहाण करीत दुखापत केली. तपास नाईक राजकिरण झाल्टे करीत आहेत.





