कन्हाळा शिवारातून कांद्याच्या 10 गोण्या लांबविल्या

10 sacks of onions were harvested from Kanhala Shivar भुसावळ (25 एप्रिल 2025) : भुसावळ तालुक्यातील शिरपूर कन्हाळा शिवारात शेतात ठेवलेल्या कांद्याच्या दहा गोण्या अज्ञात चोरट्याने लांबवल्या. या प्रकरणी संबंधित शेतकर्याने भुसावळ तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
मिलिंद सुरेश धांडे (41, रा.आनंद नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मालकीचे शेत शिवपूर-कन्हाळा शिवारात आहे. 19 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ते शेतात गेले असता, शेताच्या बांधावर भरून ठेवलेल्या कांद्याच्या 10 गोण्या दिसून आल्या नाहीत. त्यांनी याबाबत वडिलांना विचारले असता त्यांनाही कांद्यांविषयी काहीच माहिती नव्हती. त्यामुळे वडीलही शेतात आले आणि त्यांनी परिसरात शोध घेतला, परंतु कांद्याच्या गोण्या कुठेही आढळल्या नाहीत.