फैजपूर-मुक्ताईनगर बसमधून महिलेचे पावणेतीन लाखांचे दागिणे लांबवले


Woman’s jewellery worth Rs 3.5 lakh stolen from Faizpur-Muktai Nagar bus सावदा (27 एप्रिल 2025) : फैजपूर-मुक्ताईनगर बसमध्ये प्रवास करणार्‍या महिलेच्या गळ्यातील 2.61 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबवले. ही घटना 24 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.55 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चांगदेव, ता.मुक्ताईनगर येथील रहिवासी वंदना सुपडू बोदडे (48) या सावदा बसस्थानकावरून चांगदेवला जाण्यासाठी फैजपूर-मुक्ताईनगर बसमध्ये बसल्यानंतर चोरट्याने लबाडीच्या उद्देशाने त्यांच्या ताब्यातील 7.110 ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल आणि 24.740 ग्रॅम वजनाचे मंगलपोत, एकूण 31.850 ग्रॅम सोने (किंमत अंदाजे 2,61,807 रुपये) चोरून नेले.

या घटनेची तक्रार सावदा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. तपास सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !