भुसावळ पालिकेच्या लाचखोर अभियंत्यासह तिघांची जामिनावर सुटका
Three people including a corrupt engineer of Bhusawal Municipality released on bail भुसावळ (27 एप्रिल 2025) : प्लंबर लायसन्स नूतनीकरणासाठी तडजोडीअंती सहाशे रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ पालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यासह पाणीपुरवठा विभागातील अन्य दोन कर्मचार्यांना जळगाव एसीबीने बुधवारी सायंकाळी अटक केली होती. संशयीतानी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर शुक्रवारी त्यावर सुनावणी होवून 25 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
तिघा संशयीतांची जामिनावर सुटका
46 वर्षीय प्लंबरने लायसन्स नुतनीकरणासाठी पाणीपुरवठा विभागात संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडे तडजोडी अंती 600 रुपयांची लाच मागण्यात आली. एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी अंती पाणीपुरवठा अभियंता सतीश सुरेशराव देशमुख, लिपिक शांताराम उखर्डू सुरवाडे (57) व शाम समाधान साबळे (28) यांना बुधवारी सायंकाळी लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. संशयीतांना गुरुवारी दुपारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला व शुक्रवारी त्यावर दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर सुनावणी झाली.

संशयीतांना 25 हजारांच्या जात मुचलक्यावर व दोन महिन्यांपर्यंत जळगाव एसीबीच्या कार्यालयात दर बुधवारी हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला. संशयीतांतर्फे अॅड.तुषार पाटील व अॅड.मनीष सेवलानी यांनी काम पाहिले. तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव करीत आहेत.




