दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव म्हणजे पूर्नजन्मच : मंत्री संजय सावकारे
कृत्रिम अवयव शिबिरात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंचे मत

भुसावळ (27 एप्रिल 2025) : दिव्यांग असल्याने आपल्याला कुठलेही काम करता येत नाही, फक्त एका ठिकाणी बसून असतो. हा न्यूनगंड मनातून काढून नव्या उमेदीने जीवन जगावे. कृत्रिम हात, पाय अर्थात कॅलिपर्समुळे दिव्यांगांना पुर्नजन्म मिळाला आहे. या पुर्नवसनामुळे नवीन काहीतरी करून दाखवण्याची जिद्द बाळगा व न्यूनगंड कायमस्वरूपी मनातून काढा, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी येथे केले.
भुसावळ ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा सेंटरमध्ये झालेल्या देवगिरी प्रांत, केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगाव जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, एस.आर.ट्रस्ट मध्यप्रदेश आदींच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगाना मोफत कृत्रिम हात, पाय व कॅलिपर्स शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा 117 दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला.

यांची होती उपस्थिती
उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते झाले. यावेळी डॉ.धर्मेद्र पाटील आदींसह सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.गौरीश साळुंखे, राज शर्मा, सुरेंद्र ठाकूर, भरत भन्साल, हरिओम शर्मा यांनी सर्व दिव्यांग बांधवांचे तपासणी करून कृत्रिम हात, पाय बसवून दिले. यावेळी भाजप वैद्यकिय आघाडीचे डॉ.नि.तु.पाटील, माजी नगरसेवक निर्मल कोठारी, अनिल जोशी, प्रभू कचवे, भावेश कचवे, वंश वानखेडे, राज तांबट आदींनी सहकार्य केले.