जळगावात दुकान फोडले : 70 हजारांचे साहित्य लंपास


Shop broken into in Jalgaon : Materials worth Rs 70000 looted जळगाव (28 एप्रिल 2025) : शहरातील प्रताप नगरात मध्यरात्रीच्या सुमारास आमदारांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या ई स्पोर्ट साहित्य विक्रीचे दुकान फोडत चोरट्यांनी 70 हजार 834 रुपयांचे साहित्य लांबवले. ही घटना शनिवार, 26 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता समोर आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले जळगावात ?
जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील अक्सा नगरात अलीम शेख रफिक (28) हा तरुण वास्तव्यास आहे. त्यांच्या मामाचा मुलगा आमीर शेख फारुख (रा.हाजी अहमद नगर) यांच्या मालकीचे प्रताप नगरात ई स्पोर्ट नावाचे स्पोर्ट साहित्य विक्रीचे दुकान आहे. 25 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद केल्यानंतर शनिवार, 26 रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेजारी फॅशन डिझाईनर दुकानावर काम करणारा टेलर असलम शेख याने आमीर शेख यांना फोन करुन तुमच्या दुकानाचे लॉक तुटलेले असल्याचे सांगितले. त्यानुसार आमीर शेख हे तात्काळ दुकानावर जावून पाहणी केली असता त्यांना दुकानाच्या शटरचे दोन्ही कुलूप तुटलेले आढळले. त्यांनी लागलीच अलीम शेख रफिक यांना घटनेची माहिती देवून दुकानावर येण्यास सांगितले. चोरट्यांनी दुकानातून विक्रीसाठी ठेवलेल्या बॅट, टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट यासह इतर साहित्य असे एकूण 70 हजार 834 रुपयांचे साहित्य चोरट्याने लांबवले. चोरट्यांनी दुकानातून ईर्न्व्हटर व बॅटरीदेखील चोरुन नेली. दरम्यान, अलीम शेख यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !