जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचार्याकडे घरफोडी
House burglary at the home of a retired employee of Jalgaon Municipal Corporation जळगाव (29 एप्रिल 2025) : जळगाव महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी गोपालसिंह भिंमसिंह राजपूत यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 53 हजार 300 रुपयांचा ऐवज लांबवले. शहरातील यश लॉन परिसरात 25 एप्रिल रोजी ही घरफोडी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपालसिंह राजपूत (68) हे त्यांच्या पत्नीसह यश लॉन परिसरात राहतात. ते 10 एप्रिल रोजी उन्हाळी सुट्टीसाठी सोलापूर येथे त्यांच्या मुलीकडे गेले होते. 25 एप्रिल रोजी त्यांच्या शेजार्यांनी त्यांचे घर उघडे दिसल्याने त्यांना माहिती दिली. राजपूत यांनी जळगावात परत येऊन शहर पोलिसांना याबाबत सांगितले. चोरट्यांनी घरातून तीन ग्रॅम सोन्याचे मणी, चार ग्रॅमची सोन्याची लहान मुलांची चैन, नऊ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा तुकडा, चांदीच्या वाट्या, रेमंड कंपनीचे कापड, गाऊन व पाच हजारांची रोकड मिळून 53 हजार 300 रुपयांचा ऐवज लांबवला. गोपालसिंह राजपूत यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.