जळगावात चोरटे शिरजोर : मॉर्निंग वॉक करणार्या दोघांच्या सोनसाखळ्या धूम स्टाईल लांबवल्या
Thieves on the prowl in Jalgaon : Two men on a morning walk had their gold chains pulled off in a spectacular fashion जळगाव (3 मे 2025) : जळगाव शहरात मॉर्निंग वॉक करणार्या दोन महिलांना एकाच दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लक्ष्य करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवल्या. ही घटना 1 मे रोजी सकाळी घडली. दोन्ही घटनांमधील चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत.
पूजा मनोज चांडक (वय 42, रा. प्रेमनगर) या त्यांच्या परिसरातील एका मंदिराजवळ सकाळी फिरत असताना मागून आलेल्या अज्ञाताने त्यांच्या गळ्यातील 13 ग्रॅम वजनाची सोनपोत हिसका मारून तो दुचाकीवर बसलेल्या आपल्या साथीदारासह पसार झाला. या घटनेनंतर काही वेळातच दुसरी घटना फॉरेस्ट कॉलनीजवळ घडली. संगीता राजेश कर्हे (52, रा. बहिणाबाई बगीचाजवळ) या मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्या गळ्यातील सुमारे 50 हजार रुपये किमतीची सोनपोत त्याच पद्धतीने चोरट्यांनी चोरून नेली.