लाखोंच्या ठिबक नळ्यांची चोरी : जळगाव गुन्हे शाखेकडून आरोपींना बेड्या


Theft of drip pipes worth lakhs : Jalgaon Crime Branch arrests accused जळगाव (3 मे 2025) : लाखोंच्या ठिबक नळ्या चोरी प्रकरणी जळगाव गुन्हे शाखेने आरोपींना अटक केली आहे. चार लाख पाच हजार रुपयांच्या मुद्देमालासह चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना पुढील कारवाईसाठी फत्तेपुर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

फत्तेपुर येथील गट क्रमांक 39 मधील एका शेतकर्‍याच्या शेतातून 35 बंडल ठिबक नळया चोरीस गेल्या होत्या. या गंभीर प्रकाराचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपवण्यात आला होता. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे, बोदवड रोड, जामनेर येथील शेख अस्लम शेख मेहबुब यांच्या भंगार दुकानात झडती घेण्यात आली. तेथे चोरीला गेलेल्या ठिबक नळया आढळून आल्या. तक्रारदार शेतकर्‍याने वस्तूची ओळख पटवल्यानंतर दुकानदाराने शेख जावेद शेख सुल्तान (36), इकबाल उस्मान पिंजारी (30) व आलमगीर रफीक पिंजारी (35) यांच्याकडून हा माल घेतल्याचे कबूल केले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही आरोपींना तातडीने अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ठिबक नळयांचे 35 बंडल रुपये 1 लाख 05 हजार किमतीचे, गुन्ह्यात वापरलेले महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन रुपये 3 लाख रुपये किमतीचे असा एकूण मुद्देमाल 4 लाख 05 हजार जप्त करण्यात आला आहे.(केसीएन)सदर संशयित आरोपींना पुढील कारवाईसाठी फत्तेपुर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे, फत्तेपूर एपीआय अंकुश जाधव, एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, नाईक रणजीत जाधव, ईश्वर पाटील, राहुल महाजन आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !