गावठी पिस्टल बाळगून दहशत : सोलापूर जिल्ह्यातील दोघे धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात


Terrorist carrying a village pistol: Two people from Solapur district in the net of Dhule Crime Branch धुळे (3 मे 2025) : गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या सोलापूर जिल्ह्यातील दोघांना धुळे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून दोन जिवंत काडतूस व पिस्टल जप्त करण्यात आले. मलीक रियान हुसेन मुलाणी व रितेश संतोष लोहार (दोन्ही उमरगांव, ता.पंढरपूर, जि.सोलापुर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना संशयीत देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाला निर्देश दिल्यानंतर नगांवबारीचे पुढे साईकिशन हॉटेलजवळून त्यांना 3 रोजी अटक करण्यात आली. 30 हजार रुपये किंमतीचा कट्टा, दोन जिवंत काडतूस व 45 हजार रुपये किंमतीचे ोन मोबाईल जप्त करण्यात आले. हवालदार पवन गवळी यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार पवन गवळी, हवालदार आरीफ पठाण, हवालदार सचिन गोमसाळे, हवालदार सुरेश भालेराव, हवालदार देवेंद्र ठाकुर कॉन्स्टेबल मयुर पाटील अशांनी केली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !