नागपूरातून गुजरातकडे निघालेली अडीच कोटींची अवैध सुपारी धुळ्यात जप्त

धुळे गुन्हे शाखेची कामगिरी : सात वाहने जप्त : सुपारीच्या दर्ज्यासह जीएसटी बिलांवर संशय


Illegal betel nut worth Rs 2.5 crores, bound for Gujarat from Nagpur, seized in Dhule धुळे (3 मे 2025) : धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे नागपूरातून गुजरातकडे सात वाहनांद्वारे सुपारीची अवैधरित्या होणारी वाहतूक रोखत वाहनांसह तब्बल अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त केला. वाहनातील सुपारीचा दर्जा व ई वे बिल व जीएसटी बिलांबाबत यंत्रणेला संशय आहे. या संदर्भात अन्न व औषध प्रशासनासह केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग, नाशिक यांना सूचित करण्यात आले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये नाकाबंदी करण्यात आली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना कर्नाटक राज्य पासिंगचे ट्रकद्वारे अवैधरित्या सुपारीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहाडीनगर पोलीस ठाणे हद्दीत पाच वाहने तर साक्री पोलीस ठाणे हद्दीत दोन वाहने जप्त करण्यात आली. संशयीत वाहनांवरील चालकांनी नागपूरातून सुपारी भरून ती धुळे मार्गे गुजरातकडे नेली जात असल्याची कबुली दिली मात्र वाहनातील सुपारीचा दर्जा, ई वे बिल व जीएसटी पावत्यांमध्ये संशय आढळल्याने अन्न व औषध प्रशासन विभाागासह नाशिक जीएसटी विभागााला पत्रव्यवहार करण्यात आला.

अडीच कोटींच्या सुपारीसह वाहने जप्त
एक कोटी 42 लाख 34 हजार हजार 360 रुपये किंमतीची सुपारी, आठ लाख 58 हजार 104 रुपये किंमतीची सुपारी, 12 लाखांचा आयशर (के.ए.14 सी.3378), 15 लाखांचा ट्रक (के.ए.14 सी.7305), 15 लाखांचा ट्रक (के.ए.14 सी.5646), 15 लाखांचा ट्रक (के.ए.14 सी.5287), 15 लाखांचा ट्रक (के.ए.14 सी.5614), 15 लाखांचा ट्रक (के.ए.14 सी.3090), 15 लाखांचा ट्रक (जी.जे.33 टी.5999) असा एकूण दोन लाख 52 लाख 92 हजार 464 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्या आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, संजय पाटील, हवालदार सदेसिंग चव्हाण, प्रशांत चौधरी, दिनेश परदेशी, तुषार सुर्यवंशी, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, किशोर पाटील, अमोल जाधव, चालक हवालदार कैलास महाजन यांच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !