अमळनेर तालुक्यात शिक्षकाचे घर फोडत पावणेतीन लाखांचा ऐवज लांबवला


A teacher’s house was broken into in Amalner taluka and property worth Rs. 3.5 lakhs was stolen अमळनेर (4 मे 2025) : शिक्षकाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून दोन लाख 73 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवण्यात आला. अमळनेर तालुक्यातील खवशी गावात हा प्रकार घडला. या संदर्भात अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सिद्धार्थ वसंत शिरसाठ (41, रा.खवशी, ता.अमळनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून एका शाळेत शिक्षक म्हणून ते नोकरीला आहे. 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान त्यांच्या घर बंद असताना अज्ञात चोट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून घरातून रोकड आणि सोन्याचे दागिने मिळून दोन लाख 73 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला.

ही घटना उघडकीला यानंतर सिद्धार्थ सिद्ध शिरसाठ यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !