डोंगरकठोरा येथे घराला लागली आग : संसारोपयोगी साहित्य जळून खाक


House catches fire in Dongar Kathora: Household items burnt to ashes यावल (4 मे 2025) : यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील एका शेतमजुर इसमाच्या घराला गुरूवारी सायंकाळी आग लागली. यात घरातील संसारपयोगी साहित्य सह अन्न, धान्य जळून खाक झाले. या आगीत सुमारे एक लाखांचे नुकसान झाले.

डोंगरकठोरा, ता.यावल येथील शेतमजूर ज्ञानसिंग गंजा बारेला यांच्या घराला 1 मे रोजी सायंकाळी अचानक आग लागली. ही घटना गावाच्या शेती शिवारात घडली असून आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. त्यामुळे संसारोपयोगी वस्तूंसह अन्न,धान्य आदी जळुन सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी गजानन पाटील आणि महसूल सेवक विजय आढाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. ही दुर्घटना अतिशय धक्कादायक असून गरीब शेतमजुराचे कुटुंब उघड्यावर आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असुन ग्रामस्थांनी शासनाकडे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !