जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई : गावठी कट्टा बाळगणार्‍या तरुणाला बेड्या


Jalgaon MIDC police take major action : Youth caught carrying village clothes जळगाव (5 मे 2025) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी पिस्टलाच्या धाकावर दशहत निर्माण करणार्‍या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी शनिवारी, 3 मे रोजी मध्यरात्री 1 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चेतन वसंता देऊळकर (22) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

कुसुंबा शहरातील साई सिटी परिसरात चेतन वसंता देऊळकर (22) नामक तरुण गावठी पिस्टल घेवून फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पाटील यांनी तात्काळ पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार, एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवार, 2 मे सायंकाळी 7 वाजता सापळा रचून संशयित आरोपी चेतन देऊळकर याला ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्याच्याजवळून 20 हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा पिस्तूल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरून चेतन वसंत देऊळकर याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !