परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या अ‍ॅपेला आमोद्यानजीक अपघात : सावद्यातील अल्पवयीन विद्यार्थिनी ठार


Accident near Amoda सावदा (5 मे 2025) : भुसावळ शहरातील परीक्षेसाठी सावदा परिसरातील येणार्‍या विद्यार्थ्यांच्या अ‍ॅपे रिक्षाला मालवाहू रिक्षाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सावदा शहरातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू ओढवला तर अन्य पाच जण जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारा घडला. अपघातानंतर फैजपूर पोलिसांनी धाव घेतली. आदिती सोपान खडसे (13, सावदा) असे मृताचे नाव आहे.

काय घडले नेमके
सावदा शहरातील सातवीत शिक्षण घेणारे विद्यार्थी सार्थ शंतनू सरोदे (गणेश आयुर्वेदिक क्लिनिकचे संचालक डॉ. शंतनू सरोदे यांचा मुलगा), ओझल संदीप पाटील (शिक्षक संदीप पाटील यांची मुलगी), आदिती सोपान खडसे (दंतरोग तज्ञ डॉ. सोपान खडसे यांची मुलगी) तिघेही प्रवासी अ‍ॅपे रिक्षा (क्र.एम.एच.19 सी.व्ही. 3590) ने भुसावळकडे निघाले होते.


पिंपरुड फाटा ते आमोदादरम्यान समोरून लाकडे घेऊन येणार्‍या मालवाहू रिक्षाने (क्र.एम.एच.19-7064) त्यांच्या अ‍ॅपेरिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात आदिती खडसे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर ओझल संदीप पाटील, साथ सरोदे, प्रवासी रिक्षाचालक प्रभाकर ओतारी (29, सावदा) हे जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपाचार सुरु आहेत.

परीक्षेच्या शिबिरासाठी निघाले होते विद्यार्थी
अपघातात मृत व जखमी विद्यार्थ्यांनी गत वर्षापासून भुसावळ येथील ‘पेस आयआयटी इन्सिट्यूशन’ या खाजगी शिक्षण संस्थेत आयआटी, जेईई व नीटच्या तयारीसाठी शिकवणी लावली आहे. ते संस्थेच्या फैजपूर येथील शाखेत शिकवणीला जातात. यंदाचे त्यांचे दुसरे वर्ष आहे. 1 मे ते 15 मे या काळात भुसावळ येथील शाखेत राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा शिबिरासाठी ते तीन दिवसांपासून भुसावळात येत असताना अपघात घडला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !