पोलिसांच्या नावाने दहा हजारांची लाच : बळसाणेतील पोलीस पाटील धुळे एसीबीच्या जाळ्यात


Bribe of Rs 10,000 in the name of police : Police Patil from Balsane in Dhule ACB’s net धुळे (7 मे 2025) : कौटुंबिक छळ प्रकरणात दाखल तक्रारीनंतर दोषारोपपत्र तातडीने दाखल करण्यासाठी पोलिसांच्या नावाने दहा हजारांची लाच मागून दोन हजारांची लाच स्वीकारताना बळसाणे, ता.साक्री येथील पोलीस पाटलाला धुळे एसीबीने अटक केली आहे. आनंदा भटा पाटील (36) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

काय आहे लाच प्रकरण
39 वर्षीय तक्रारदार हे बळसाने गावातील रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नीने निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. गावातील पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यांनी तक्रारदार यांची भेट घेत त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास लवकर पूर्ण करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्याकरिता पोलिसांना दहा हजार रुपये द्यावे लागतील, असे 15 एप्रिल रोजी सांगितले व पोलिसांच्या नावाने लाच मागणी केल्याने धुळे एसीबीकडे तक्रार देण्यात आली. लाच पडताळणीत आरोपीने दहा हजारांची लाच मागणी करून आठ हजारात तडजोड करण्याचे मान्य केले व मंगळवार, 6 मे रोजी रात्री उशिरा लाचेतील पहिला हप्ता म्हणून दोन हजार रुपये स्वीकारताना पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यांना पकडण्यात आले. आरोपीविरोधात निजामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.


यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार राजन कदम, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील आदींच्या पथकाने यशस्वी केला.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !