अमरावती जिल्ह्यात धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवले : भुसावळातील ईराणी जाळ्यात
Dhoom style mangalsutra extended in Amravati district: Irani from Bhusawal caught in the net भुसावळ (7 मे 2025) : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस ठाणे हद्दीत पतीसोबत मंदिरात जात असलेल्या विवाहितेच्या गळ्यातून धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवण्यात आले होते. ही घटना 7 एप्रिल रोजी घडली होती. आरोपींनी 18 ग्रॅम 750 मिलि वजनावे च एक लाख 17 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवल्याप्रकरणी परतवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी भुसावळात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यास भुसावळातील बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली. मझर अब्बास जाफर ईराणी (मुस्लिम कॉलनी, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण
पतीसोबत जात असलेल्या विवाहितेचे मंगळसूत्र लांबवल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व पोलिसांच्या तपासात सीसीटीव्हीत घटना चित्रीत झाल्याने आरोपीची बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने ओळख पटवण्यात आली. 5 मे रोजी परतवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी भुसावळात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या मुस्लीम कॉलनीतून मुसक्या आवळण्यात आल्या. विशेष म्हणजे आरोपीने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ही मुक्ताईनगरातून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

यांनी आवळल्या मुसक्या
भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनखाली हवालदार विजय नेरकर, प्रशांत परदेशी, योगेश माळी, जावेद शहा, अमर अढाळे, सचिन चौधरी, भूषण चौधरी आदींच्या पथकाने केली.




