वाळूचे ट्रॅक्टर पकडताना यावल तहसीलदारांच्या वाहनाला अपघात : सुदैवाने तहसीलदार बचावल
Yaval Tehsildar’s vehicle met with an accident while trying to catch a sand tractor : Fortunately, the Tehsildar survived यावल (9 मे 2025) : यावल तालुक्यातील कोळन्हावी तापी नदीच्या पात्रात दोन ट्रॅक्टरव्दारे वाळू चोरी होत असल्याची गोपनीय माहिती यावलच्या तहसीलदारांना मिळाल्यानंतर त्या पथकासह विदगाव नदीपात्रातून नदीत वाहनासह दाखल झाल्या. ट्रॅक्टरच्या दिशेने पाठलाग करत असताना शासकिय वाहन नदीपात्रात उलटले. या अपघातामध्ये तहसीलदारांसह तलाठी व कोतवाल बालंबाल बचावले. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेत शासकीय वाहनाचे मात्र नुकसान झाले आहे. तर या अपघातानंतर वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर चालक तेथून पसार झाले.
काय घडले नेमके
कोळन्हावी, ता.यावल गावाजवळील नदीपात्रातून दोन ट्रॅक्टर द्वारे वाळू चोरी केली जात असल्याची माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने वाहन चालक अरविंद बोरसे यांच्यासह किनगावचे तलाठी अमित राऊत, कोतवाल विजय साळवे व अन्य एक कोतवाल यांना सोबत घेत तापी नदीच्या दिशेने रवाना झाल्या.

दरम्यान, तापी नदीच्या पात्रात उतरण्यासाठी विदगावकडून त्यांनी आपले शासकिय वाहन नदीत पात्र उतरवले मात्र नदीपात्रात अरुंद रस्त्यात वाहन अपघातग्रस्त झाले आणि नदीपात्रात उलटले. सुदैवाने अपघातामध्ये सर्वच बालंबाल बचावले. अपघात घडल्याचे पाहून तापीतून वाळू चोरी करून नेणार्या ट्रॅक्टर चालकांनी पळ काढला.




