भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत जिल्हास्तरीय दोन दिवसीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात


District level two-day boxing competition in full swing at Bhusawal Ordnance Factory भुसावळ (9 मे 2025) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील ऑर्डनन्स फॅक्टरीच्या स्पोर्ट्स ग्राउंडवर नुकतेच दोन दिवसीय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे आयोजन बौद्ध मंडळ, भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी आणि निलेश बॉक्सिंग फिटनेस क्लब पुणेतर्फे केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन कार्यकारी निदेशक निरंजन लाल यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून यंत्र महिला कल्याण समितीच्या अध्यक्षा शोभाना शर्मा उपस्थित होत्या. त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

4 मे रोजी अंतिम फेरीच्या स्पर्धा रंगल्या. यामध्ये विजेत्या बॉक्सर्सना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास संयुक्त महाप्रबंधक अभय गोगाटे, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य डी.एस. नंदेश्वर, एच.एम. सुरेश नरहिरे तसेच यंत्र महिला कल्याण समितीच्या पदाधिकारी महिला, विविध युनियन आणि असोसिएशनचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, क्रीडा समितीचे सदस्य, प्रशिक्षक व महिला मंडळाचे सदस्य तसेच अनेक बॉक्सिंगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या यशस्वी कार्यक्रमासाठी ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळमधील विविध विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच निलेश बॉक्सिंग फिटनेस क्लब, पुणे आणि त्यांच्या सहकार्‍यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाच्या आयोजनात बौद्ध मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वानखेडे, महासचिव एम.एस. राऊत, कॅशियर संजय आहिरे, वर्किंग प्रेसिडेंट रमेश सुरवाडे, उपाध्यक्ष एस.टी. तायडे तसेच अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !