भुसावळात वृद्धाची बॅग हिसकावून सात हजारांची लूट : दोन तासात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ (10 मे 2025) : शहरातील जामनेर रोडवरील कृष्णाली हॉटेलजवळ सार्वजनिक ठिकाणी एक वृद्ध व्यक्ती जबरी चोरीला बळी पडल्याची घटना बुधवारी सकाळी 10.30 च्या सुमारास घडली. बुढनशाह रमजानशहा छप्परबंद (वय 77, रा. ईनामुल हसन मस्जिद, भुसावळ) असे फिर्यादीचे नाव आहे. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या दोन तासात संशयीत अमर कसोटे (रा. झेडटीसी परिसर, भुसावळ) याच्या मुसक्या आवळल्यात.

काय घडले भुसावळात ?
बुढनशाह छप्परबंद हे आजान देण्याचे काम करतात. सकाळी ते जामनेर रोडने जात असतांना कृष्णाली हॉटेलजवळून जात असतांना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या पाठीवर आणि मानेवर चापटा मारत त्यांच्याकडून पैसे मागितले. बुढनशाह यांनी त्यास विरोध केल्यावर संशयीताने त्यांच्या खांद्यावरची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. यावेळी अगर किसी को बताया तो तुझे मार डालूंगा अशी धमकी देत संशयीतांने घटनास्थळावरून पळ काढला. या बॅगेमध्ये 500 रुपयांच्या नोटा, 200 रुपयांच्या 15 नोटा आणि 100 रुपयांच्या 20 नोटा असे एकूण 7 हजार रुपयांची रक्कम होती. या घटनेनंतर येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री 11.41 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.


पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पोलिस ठाण्यात बुढनशाह यांनी दिलेल्या माहितीवरून बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळोल्या गुप्त माहितीच्या आधारे सहायक निरीक्षक निलेश गायकवाड यांनी संशयीत अमर कसोटे याला झेडटीसी परिसरातून ताब्यात घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !