रावेर पोलिसांकडून रसलपूरातील अवैध कत्तलखान्यावर कारवाई : चौकडी जाळ्यात
Raver police take action against illegal slaughterhouse in Rasalpur: Four arrested रावेर (10 मे 2025) : रावेर पोलिसांनी रसलपूर येथे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर कारवाई करीत चौकडीला अटक करण्यात आली आहे.केली.
रसलपूर येथे 9 रोजी पहाटे छापा टाकला असता सलीम उस्मान कुरेशी यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत काही व्यक्ती गोवंश मांसाची विक्री करताना आढळले. पोलिसांनी या कारवाईत सादीक शेख नुरा, वसीम कय्युम कुरेशी, शेख शकील शेख कलीम आणि सलीम उस्मान कुरेशी या चार जणांना ताब्यात घेतले. काही इसम अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.

पोलिसांनी या कारवाईत सुमारे 740 किलो गोमांस (अंदाजे किंमत एक लाख 48 हजार रुपये), कापलेल्या गोवंश प्राण्याची कातडी, तसेच 4 कुर्हाडी (किंमत 1,200 रुपये) आणि सुरे (किंमत 800 रुपये) जप्त केले. जप्त केलेल्या मांसाचे पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत नमुने घेऊन नियमानुसार त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल व त्यांच्या गुन्हे शोध पथकाने केली. पुढील तपास हवालदार सतीष सानप करीत आहेत.




