आनंददायी अध्ययनासाठी शिक्षकांनी एआयचा वापर करावा : शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचे प्रतिपादन
जळगाव (11 मे 2025) : शिक्षणात नवा आनंद आणि गुणवत्ता यावी, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक उपयुक्त साधन ठरू शकते. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल करून, नव्या तंत्रज्ञानाचा चा स्वीकार केला पाहिजे, असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी केले.
त्या गुरुकुलम इंग्लिश स्कूल जळगाव येथे झालेल्या पाच दिवसीय शिक्षक कार्यशाळेत बोलत होत्या. ही कार्यशाळा जिल्हा प्रशिक्षण संस्था, माध्यमिक शिक्षण विभाग, समता फाउंडेशन मुंबई, नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर सायंटिस्ट (भारत) व जळगाव जिल्हा जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, रागिणी चव्हाण, एजाज शेख, गुरुकुलम स्कूलचे संचालक संकेत पाटील, मन्नालाल अग्रवाल, स्किल अँड टेक्निकल इन्स्टिट्यूट वाईस प्रिन्सिपल अमोल कळंबे, -ख व रोबोटिक्स ट्रेनर मयूर अहेर, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे, उपाध्यक्ष संदीप पाटील, सचिव सुनील वानखेडे, गुरुकुलमच्या प्रिन्सिपल वृषाली पाटील आणि समन्वयक ललित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता अग्रवाल यांनी केले तर आभारप्रदर्शन सुनील वानखेडे यांनी मानले.
या कार्यशाळेत ए आय ची प्राथमिक ओळख, चॅट जी पी टी , मॅजिक स्कूल, सुनो, स्लाईड्स गो, ड्युरेबल ए आय, फ्लेक्सी ए आय, वुलफ्रॉम अल्फा, क्वेश्चन वेल, पी डी एफ, पी पी टी, गुगल फॉर्म्स यांसारख्या ए आय टूल्स ची ओळखआणि प्रत्यक्ष प्रॅक्टिस घेतली.


